Breaking News
दापोली : दापोली वक्फ जमीन व्यवहाराला नवे वळण, जमीन व्यवहार प्रकरणी दापोली उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांची बाजू समोर, ‘माझे सर्व कागदपत्रे क्लिअर, वक्फ बोर्डाच्या जमिनीचे खरेदीखत होत नाही, मी जागा पाहून घेतली’ – खालिद रखांगे यांची कोकण कट्टा न्यूजला माहिती राजापूर : गवतात पडलेल्या महावितरणच्या विजेच्या तारेला स्पर्श, शेतकऱ्याचा जागीच मृत्यूमहावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात ग्रामस्थ संतप्त रत्नागिरी : भरधाव ॲक्टिव्हाची महिलेला जोरदार धडक, गंभीर जखमी करून चालक पसार गुहागर : ग्रामदेवतेच्या मंदिरातून 32 हजारांचे दोन अॅम्प्लिफायर चोरीला राजापूर : दिवसा घरफोडी, कुलूप तोडून 12 हजारांचे चांदीचे साहित्य लंपास

रत्नागिरी : पिग्मी एजंटकडून 182 जणांची 20 लाखांची फसवणूक

banner 468x60

पिग्मी एजंटने खोटी कागदपत्रे तयार करुन 182 नागरिकांकडून पैसे उकळून त्यांची तब्बल 20 लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी एकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना 3 मार्च 2018 ते 21 ऑगस्ट 2023 या कालावधीत घडली आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

प्रदिप नारायण कोतवडेकर (53, रा. बेलबाग, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात सय्यद मोहम्मद इलीयास हुसैन (51,रा.उद्यमनगर,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार, संशयित प्रदिप कोतवडेकर हा रत्नागिरी येथील कोकण मर्कंटाईल को ऑप.बँकेत पिग्मी एजंट म्हणून काम करतो.

त्याने खोटी कागदपत्रे तयार करत 182 जणांकडून 3 मार्च 2018 ते 23 ऑगस्ट 2023 या 5 वर्षांच्या कालावधीत पिग्मीचे तब्बल 19 लाख 89 हजार 410 रुपये पैसे जमा केले.

ते पैसे बँकेत न भरता आपल्या फायद्यासाठी वापरुन त्याने या सर्वांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात भादंवि कायदा कलम 409, 420, 465, 467, 471, 477 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *