Breaking News
खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा

दापोली : उपजिल्हा रुग्णालय व्हेंटिलेटरवर, अधिकाऱ्यांची वानवा ! गरिबांचा कैवारी कोण ?

banner 468x60

दापोली येथील उपजिल्हा रग्णालय व्हेंटिलेटरवर गेले आहे. ५० खाटांच्या उपजिल्हा रग्णालयात एकही एमबीबीएस दर्जाचा वैद्यकीय अधिकारी नाही.

याठिकाणी सर्वच कंत्राटी बीएचएमएसचे वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. त्यामुळे या रग्णालयाचा कारभार रामभरोसे आहे. क्षयरोग तज्ञाअभावी प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची हालत होत असून, महिलांना खासगी रग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे.

banner 728x90 banner 728x90

तसेच गंभीर रग्णांना उपचारासाठी तज्ञ वैद्यकीय अधिकारी नसल्याने खासगी रग्णालय किंवा जिल्हा शासकीय रग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला जातो.

दापोली येथील उपजिल्हा रग्णालयात वैद्यकिय अधीक्षक वर्ग 1 चे 1 पद मंजूर असून ते रिक्त आहे. वैद्यकीय अधिकारी वर्ग 7 पदे असुन मंजूर असुन 1 पद भरलेले आहे, तेही पद प्रतिनियुक्तीवर असल्याने सद्यस्थितीत 7 पदही रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकारी (सर्जन), वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (बधिरीकरण), वैद्यकीय अधिकारी (भिषक), वैद्यकीय अधिकारी (बालरोग तज्ञ) यांचे प्रत्येकी 1 पद मंजूर असूनही ही सर्व पदे रिक्त आहेत.

सुश्रूषा विभागातील सहाय्यक अधिसेविका वर्ग 3 चे 1 पद मंजूर असून ते रिक्त आहे. अधिपरिचारिका वर्ग 3ची 12 पदे मंजूर असून त्यातील 8 पदे कायमस्करपी भरलेली असून, 4 पदांवर अस्थायी कर्मचारी कार्यरत आहेत.

क्ष-किरण तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध-निर्माण अधिकारी, नेत्रचिकित्सा अधिकारी या पदावर कर्मचारी कार्यरत असून लिपिक संवर्गातील सहाय्यक अधीक्षक 1 पद, वरिष्ठ लिपिक 1पद मंजूर असून ही पदे रिक्त आहेत.

अन्य चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचीही अनेक पदे रिक्त आहेत. सध्या या रग्णालयात अत्यावश्यक औषधांचा पुरेसा साठा असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या रग्णालयात दापोली, मंडणगड, खेड येथील रग्ण उपचारासाठी येत असून दररोज २०० ते ३०० रग्ण येथे उपचारासाठी येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *