दापोली : गुहागर, दापोली मतदारसंघात शिवसेना अल्पसंख्याक सेलची स्थापना

banner 468x60

गुहागर व दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना अल्पसंख्याक सेल स्थापन करण्यात आला असून त्याच्या सर्वच पदाधिकाऱ्यांची निवड अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष सिकंदर जस्नाईक यांनी शुक्रवार, दि. ६ रोजी जाहीर केली.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

आमदार योगेश कदम यांच्या हस्ते खेड तालुक्यातील जामगे येथे अल्पसंख्याक सेलच्या सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.

खेड तालुक्यातील जामगे येथे शुक्रवार, दि. ६ रोजी शिवसेना नेते रामदास कदम, योगेश कदम, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, माजी जिल्हापरिषद सदस्य अरुण कदम, तालुका प्रमुख सचिन धाडवे, अल्पसंख्यांक सेल जिल्हा अध्यक्ष सिकंदर जस्नाईक, माजी सभापती मन्सूर नाडकर आदींच्या उपस्थितीत गुहागर व दापोली विधानसभा मतदार संघातील अल्पसंख्याक सेलच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली.

यावेळी आ. योगेश कदम यांच्याहस्ते शिवसेना अल्पसंख्याक सेल नवनियुक्त पदाधिकारी यांना निवड पत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *