भोर –महाड मार्गावरील वरंधा घाटातील वारवंड ते शिरगाव दरम्यान शिरगाव हद्दीत पुणे स्वारगेटहून भोरमार्गे महाड चिपळूणकडे जाणाऱ्या मिनीबसचा अपघात झाला आहे.
🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy
हा अपघात मध्यरात्री दोनच्या सुमारास झाला आहे. बस रस्ता सोडून धरणाच्या बाजूला ५० ते ६० फूट खोल दरीत कोसळली आहे. धरणाच्या पाण्यापासून पाच फुटावर गाडी अधांतरी अडकल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
बसमधील काही प्रवाशांना दुखापत झाली आहे. तर बस चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गाडीत चालकासहीत दहा ते अकरा प्रवासी होते. त्यातील तीन ते चार जण जखमी झालेत. जखमींना भोर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
या घाटातून चालताना चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघात झाल्यानंतर गाडीतील चालकासह चार जण दरीतून रस्त्यावर आले.
रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकाने अपघात स्थळापासून जवळच असलेल्या सह्याद्री हॉटेल मालकाला अपघाताची माहिती दिली. त्यानंतर हॉटेल मालक दत्ता पोळ, अक्षय धुमाळ, भीमा पोळ, संतोष पवार या शिरगावच्या तरुणांनी घटनास्थळी
धाव घेऊन अधांतरीत असलेल्या बसला प्रथम दोरीने बांधले व त्यानंतर अपघातग्रस्त गाडीतीतील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. तसेच घटनेची माहिती कळताच भोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील, व सहकारी तसेच सह्याद्री रेस्क्यूचे सचिन देशमुख व टीमने घटनास्थळी पोचून
अपघातातील व्यक्तींना बाहेर काढण्यास मदत करुन जखमींना रुग्णालयात पाठवले. यावेळी घटनास्थळी आंबवडे आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ अनिकेत मांगले, चिकन मंजुश्री चिकणे, दिलीप देवघरे उपस्थित होते.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















