Breaking News
चिपळूण : सावर्डेतील 13 वर्षीय अपहरण झालेल्या मुलीचा मुंबईत शोध, संबंधित युवक पोलिसांच्या ताब्यात, चार दिवसांच्या शोधमोहिमेनंतर रत्नागिरी पोलिसांना यश; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची विशेष पथके मुंबईत दाखल, मुलगी सुरक्षित रत्नागिरी : रस्त्यावर फिट आल्याने 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू, उपचारादरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्राणज्योत मालवली संगमेश्वर : मार्लेश्वर दर्शनाला आलेल्या सहा वर्षीय चिमुकलीचा दगड डोक्यात पडून मृत्यू, दोघे जखमी रत्नागिरी : डायलिसिस सेवा बंद करण्याचा प्रयत्न केल्यास कंपनीवर कारवाई करणार उदय सामंतांचा इशारा, रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही डायलिसिस केंद्रे सुरू राहणार चिपळूण : प्रशांत यादव यांच्या ‘स्वामिनी’ निवासस्थानी भाजपचा दिवाळी स्नेहमेळावा, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थितीखेर्डी येथे दिवाळी फराळाचे आयोजन, स्नेहबंध दृढ करत अनौपचारिक संवादातून साधला संवाद

रत्नागिरी : सेल्फी काढताना अल्लाउद्दीन मोंडलचा समुद्रात बुडून मृत्यू, जीव वाचवण्याचा खूप प्रयत्न झाला, पण…

banner 468x60

धोकादायक ठिकाणी उभा राहून सेल्फी काढणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. शहरातील भगवती बंदर ब्रेकवॉटर वॉल येथे समुद्रात सेल्फी काढताना लाटेसोबत वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू झाला.रविवारी (ता. १) घटना घडली. बुडालेल्या तरुणाचा मृतदेह स्थानिक तरुणांनी बाहेर काढला.

अल्लाउद्दीन नसिरूद्दीन मोंडल (वय १९, मूळ रा. पश्चिम बंगाल, सध्या रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, मोंडल हा हार्बर अटलांटिक फिश एक्स्पोर्ट या कंपनीत कामाला होता. रविवारी कंपनीला सुट्टी असल्याने तो मित्रासोबत भगवती बंदर येथील ब्रेकवॉटर वॉलवर गेला होता.

तिथे फिरत असताना समुद्राच्या पाण्याजवळ गेला आणि या धोकादायक ठिकाणी सेल्फीचा मोह त्याला अनावर झाला. दगडांमध्ये सेल्फी काढत असताना समुद्राच्या लाटेने तो समुद्रात ओढून वाहून जाऊ लागला. त्याला वाचविण्याचा भरपूर प्रयत्न झाला; परंतु त्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही.

याबाबत त्याचा मित्र राकीबुल इस्लाम साहेब अली मोल्ला याने फोन करून अल्लाउद्दीन मोंडल पाण्यात वाहून जात असल्याचे सांगितले. तसे कंपनीतील इतर कामगारांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यांनी अल्लाउद्दीनला समुद्राच्या पाण्यातून बाहेर काढून रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मोंडलला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *