Breaking News
दापोलीच्या लाडघर समुद्रकिनाऱ्याला आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार; महाराष्ट्राचा प्रथमच जागतिक यादीत समावेश, लाडघरसह गुहागर आणि श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यांचाही गौरव, 15 नोव्हेंबरपासून ब्ल्यू फ्लॅग हंगामाला सुरुवात चिपळूण: दिवाळीतच खेर्डीकरांवर पाणीटंचाईचे संकट, सलग पाच दिवस पाणीपुरवठा विस्कळीत मंडणगडचा पाणीप्रश्न आता इतिहासजमा होणार! 41 कोटी 69 लाखांच्या नळपाणी योजनेचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून योगेश कदमांचे कौतुक; नागरिकांना दिवाळीची मोठी भेट दापोली : भाजपला धक्का! युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विराज खोत यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, पक्षातील अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत दिला होता राजीनामा राजापुरात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा 26 वर्षीय तरुण जेरबंद, 83 हजारांचा मुद्देमाल जप्त

दापोली : जेसीआयचा जैतरा सप्ताह उत्साहात संपन्न

banner 468x60

जेसीआय या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या जेसीआय भारत यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जैतरा २०२३ हा समाजपयोगी सप्ताह जेसीआय दापोली या संस्थेमार्फत दापोली मध्ये विविध उपक्रमांच्याद्वारे उत्साहात संपन्न झाला.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

दिनांक ९ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर यादरम्यान या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते, प्रत्येक दिवशी नाविन्यपूर्ण व समाजपयोगी उपक्रमांनी या सप्ताहाचे आयोजन केले होते.

यामध्ये मोफत आरोग्य शिबिर दापोली आगार येथे कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते, यामध्ये रक्त तपासणी, डोळे तपासणी, दंत तपासणी इत्यादी तपासण्या मोफत करण्यात आल्या यामध्ये १५७ कर्मचाऱ्यांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.

यामध्ये मोफत आरोग्य शिबिर दापोली आगार येथे कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते, यामध्ये रक्त तपासणी, डोळे तपासणी, दंत तपासणी इत्यादी तपासण्या मोफत करण्यात आल्या यामध्ये १५७ कर्मचाऱ्यांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.

या सप्ताह दरम्यान जेसीआय दापोली व संतोष अबगुल प्रतिष्ठान यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये तब्बल १६१ रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य केले, तसेच दापोली पोलीस ठाणे येथे पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या दृष्टिकोनातून वॉटर प्युरिफायर प्रदान करण्यात आले, तसेच पाणी संवर्धन संदर्भात दापोली शहरांमध्ये शाळा, महाविद्यालये, शासकीय व निमशासकीय कार्यालये, खाजगी कार्यालये व सार्वजनिक ठिकाणी स्टिकर्स लाऊन जनजागृती करण्यात आली.

त्याचप्रमाणे उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे रुग्णांच्या नातेवाईकांसाठी बसण्यासाठी विसावा वाटिका याचे सुशोभीकरण करण्यात आले.

तसेच, एन के वराडकर महाविद्यालय येथे तंबाखूसेवन विरोधात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यशाळेमध्ये जेसीआय दापोलीचे अध्यक्ष डॉक्टर सुयोग भागवत यांनी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले.

त्याचप्रमाणे दान या उपक्रमाअंतर्गत जेसीआय दापोलीच्या वतीने सागरपुत्र आश्रम शाळा, सावित्रीबाई फुले वसतिगृह व बहु विकलांग विद्यार्थ्यांचे आनंद फाउंडेशन येथे गृहपयोगी वस्तू देण्यात आल्या, तसेच क्लीन प्लेट चॅलेंज या संदर्भामध्ये स्टिकर्स लावून विविध ठिकाणी जनजागृती देखील करण्यात आली, तर ३५० हून अधिक विद्यार्थ्यांनी अन्न वाया जाऊ देणार नाही यासंदर्भामध्ये शपथ देखील घेतली.

जेसीआय दापोली या संस्थेच्या सभासदांमध्ये व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन तसेच आपापल्या व्यवसायासंदर्भामध्ये इतर सभासदांना माहिती देऊन आपल्या व्यवसाय वाढीसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यशाळे दरम्यान जेसीआय दापोलीच्या सभासदांनी आपापल्या व्यवसाय संदर्भात माहिती दिली.

आज पर्यंत जेसीआय दापोलीच्यामाजी अध्यक्षांचा सपत्नीक सन्मान देखील या सप्ताह दरम्यान करण्यात आला. तसेच गव्हे येथील अरविंद अमृते व शैला अमृते यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

समाजामध्ये विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करत असलेले पण ज्यांचा नाम उल्लेख किंवा सन्मान होत नाही अशा व्यक्तींचा सॅल्यूट द सायलेंट वर्कर या विशेष उक्तीखाली जेसीआय दापोलीच्या वतीने सन्मान करण्यात आला, व अखेरच्या दिवशी पर्यावरण पूरक, आरोग्याचा व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जेसीआय दापोली व दापोली सायकलिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शहरांमध्ये सायकल रॅली काढून या सप्ताहाचा समारोप करण्यात आला.

या सप्ताह दरम्यान जैसे दापोलीचे अध्यक्ष जेसी डॉक्टर सुयोग भागवत सचिव फराज रखांगे, यांच्यासह जेसीआय दापोलीच्या सर्वच सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *