संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी तेर्ये येथील सामाजिक कार्यकर्ते शरद बाईत यांची दुचाकी जाळण्याचा गंभीर प्रकार शनिवारी मध्यरात्री घडला आहे.
🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy
या बाबत त्यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून संगमेश्वर पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. तर अज्ञाताने दुचाकी जाळल्याने परिसरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
तेर्ये- बुरंबी येथील शरद बाईत यांनी नेहमीप्रमाणे आपली दुचाकी क्टिवा घराबाहेर जिन्याखाली पार्क केली होती. शनिवारी रात्री अज्ञाताने ही दुचाकी घरापासून सुमारे १५० ते २०० मीटर लांब नेऊन जाळली आहे.
हा प्रकार रविवारी सकाळी निदर्शनास आला. त्या नंतर श्री बाईत यांनी आपली दुचाकी अॅक्टिव्हा गाडी क्र. एमएच ०८ एक्स ५५१३ शनिवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकाकडून जाळण्यात आली असल्याची तक्रार संगमेश्वर पोलीस ठाण्यात केली.
या नंतर संगमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. याबरोबरच सायंकाळी अजून काही ठिकाणचे फुटेज मिळवली जात आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















