मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर भरणेनाकानजीक जगबुडी नदीच्या पुलावर चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला अपघात झाला.
🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy
या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले. दि. २२ रोजी सकाळी १० वाजता ही घटना घडली. खेड तालुक्यातील तुळशी खुर्द येथून चिपळूणकडे जात असताना हा अपघात झाला.
चिपळूणच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी (एमएच ०८, बीबी ०३७०) वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी पुलाच्या दुभाजकावर धडकून सुमारे दहा ते पंधरा फूट घसरत गेली.
या अपघातात श्रवण रवींद्र गावडे ( वय १२), रवींद्र गोपाल गावडे (वय ४२) व स्वप्निल सुतार (वय ३१) हे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच श्री जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थेच्या मोफत रुग्णवाहिकेचे चालक सुरज हंबीर यांनी रुग्णवाहिका घटनास्थळी नेली.
त्यानंतर जखमी झालेल्यांना कळंबणी बुद्रुक येथील उपजिल्हा रुग्णालय येथे प्रथम उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













