Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

खेड : घर फोडून 1 लाख 68 हजारांचा माल लंपास

banner 468x60

शहरातील मध्यवर्ती भागात चोरट्याने दि. १३ रोजी रात्री १० वे ११.४० वाजण्याच्या मुदतीत एक बंद घर फोडून १ लाख ६८ हजार ४५७ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

banner 728x90

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

या प्रकरणी पोलिसांनी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. खेड शहरात दि. १३ रोजी रात्री १० ते ११.४० वाजण्याच्या मुदतीत विवेक बाबुराव यादव (वय २७) यांच्या बंद खोलीचा दरवाजाचे कुलूप इसमाने कोणत्यातरी धारदार शस्त्राने तोडून घरातील १ लाख ६८ हजार ५४७ रुपयाचा ऐवज चोरुन नेला.

यादव यांनी याबाबत खेड पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

यादव यांच्या घरातून चोरीला गेलेल्या वस्तूमध्ये ४० हजार १७० रुपये किमतीचे एच. पी. चंदेरी रंगाचा ८. जी. बी. ची रॅम, ५१२ जीबी एस. डी. विडोज ११ ऑपरेटिव्ह सिट कोअर १३ प्रोसेसर,

९७ हजार ८६५ रुपये किमतीचे १० ग्रॅम धातूची चैन, ५५ हजार ७०० रुपये किमतीची ३० ग्रॅमची २० इंचाची धातूची चैन, ४ हजार ४४८ रुपये किमतीची सोन्याची अंगठी १९ हजार १०५ रुपये किमतीची सोन्याची चैन असा एकूण १ लाख ६८ हजार ५४७ रुपये किमतीचा मुद्देमालाचा समावेश आहे. या घरफोडीचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *