Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

दापोली : येथे मटका अड्डयावर छापा

banner 468x60

गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दापोली शहरातील पोस्टगल्ली येथे एका टपरीच्या आडोशाला मटका खेळण्यासाठी रक्कम स्वीकारणाऱ्या संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

banner 728x90

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी येथील गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना दापोली शहरातील पोस्टगल्ली येथे एक व्यक्ती लोकांकडून पैसे स्वीकारून मटका व्यवसाय करतो, अशी माहिती मिळाल्यावर या पथकाने १३ सप्टेंबरला सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास पंचासमवेत छापा मारला असता संशयित विनोद अवधूत मयेकर (रा. लाडघर दत्तवाडी) हे एका पावतीबुकात मुंबई मटका जुगाराचे आकडे व त्यासमोर पैसे लिहित असल्याचे आढळून आले.

पथकाने त्याच्याकडून रोख रुपये २ हजार १४० रुपये व पावतीपुस्तक जप्त केले आहे. हेडकॉन्स्टेबल विजय आंबेकर यांनी या संदर्भात दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, संशयित विनोद अवधूत मयेकर याच्याविरोधात महाराष्ट्र जुगार अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हेडकॉन्स्टेबल अशोक गायकवाड करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *