दापोली : विद्यार्थ्यांनी साकारले गणपती बाप्पा!

banner 468x60

अवघ्या काही दिवसांत गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती व्हावी, या हेतूने पर्यावरणपूरक शाडूपासून विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पा साकारले आहेत.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

विद्यार्थ्यांनी सुंदर गणेशमूर्तींची निर्मिती केली. तसेच भविष्यातही आपण शाडू मातीच्या गणेशमूर्ती तयार करू, असा संकल्प त्यांनी यावेळी केला. दापोलीतील विद्यार्थ्यांनी शाडू माती वापरुन आपल्या मनातील गणेश मुर्त्या साकारल्या.

ए.जी.हायस्कूल दापोली येथे, रत्नागिरी जिल्हा परिषद पुरस्कृत जे.जे.आर्ट आॅफ गॅलरीज यांचे मार्गदर्शनार्थ तालुक्यातील 21 विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचा प्रमुख विषय शिल्प निर्मिती होता.

मातीकामातून गणेशमुर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक करुन घेण्यात आले. विविध रुपातील गणेश मुर्त्या यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी तयार केल्या.

पर्यावरणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे म्हणून अमोल पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांकडून शाडू मातीपासून गणपती बनवून घेत पर्यावरणाचे रक्षण करू, असा संकल्प केला.

यावेळी शाडू माती कशी वापरावी, त्यापासून मूर्ती कशी साकारावी, याचे सविस्तर मार्गदर्शन केलंय. मुलांनी आपल्या मनातील गणपती मुर्ती साकरल्या, विद्यार्थ्यांनी नाखुशीने कार्यशाळेतून निरोप घेतला.

संपूर्ण कार्यशाळेचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन मार्गदर्शक शिक्षक संजय निवाते यांनी केले. पुढील कार्यशाळा नाट्य या विषयी होणार असल्याचे निवाते यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *