कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर भीषण अपघात

banner 468x60

कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर आंबेवाडी जवळ एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहेत.

🔴 कोकणातील सर्व बातम्या पाहण्यासाठी Kokan Katta Live .. YouTube https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE

चैनलला subscribe करा आणि आवडल्यास व्हीडिओ जरूर शेअर करा

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

ज्योतिबाचे दर्शन घेऊन परत येत असताना एका कारला हा अपघात झाला आहे. या अपघातामुळे कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

शनिवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला. कार, रिक्षा आणि दोन दुचाकी यांची एकमेकांना धडक होऊन अपघात झला. सर्व जखमींना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आल असून नऊ जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

या अपघाताची माहिती मिळताच जखमेच्या नातेवाईकांनी सीपीआर रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती. अपघातस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर येथील बिडगर कुटुंब हे जोतिबाचे दर्शनासाठी कोल्हापुरात आले होते.

ज्योतिबाचे दर्शन घेऊन ते कारमधून कोल्हापूरच्या दिशेने येत असताना आंबेवाडी येथे असलेल्या रेडेडोहजवळ सुंदर बिडगर यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कारने पन्हाळ्याच्या दिशेने निघालेल्या रिक्षाला जोरदार धडक दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *