Breaking News
दापोलीच्या लाडघर समुद्रकिनाऱ्याला आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार; महाराष्ट्राचा प्रथमच जागतिक यादीत समावेश, लाडघरसह गुहागर आणि श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यांचाही गौरव, 15 नोव्हेंबरपासून ब्ल्यू फ्लॅग हंगामाला सुरुवात चिपळूण: दिवाळीतच खेर्डीकरांवर पाणीटंचाईचे संकट, सलग पाच दिवस पाणीपुरवठा विस्कळीत मंडणगडचा पाणीप्रश्न आता इतिहासजमा होणार! 41 कोटी 69 लाखांच्या नळपाणी योजनेचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून योगेश कदमांचे कौतुक; नागरिकांना दिवाळीची मोठी भेट दापोली : भाजपला धक्का! युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विराज खोत यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, पक्षातील अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत दिला होता राजीनामा राजापुरात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा 26 वर्षीय तरुण जेरबंद, 83 हजारांचा मुद्देमाल जप्त

चिपळूण : अपघातात एसटी चालक गंभीर जखमी

banner 468x60

शहरातील पागनाका येथे शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता आयशर ट्रक व दुचाकीमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. संबंधित तरुण येथील आगारात एसटी चालक म्हणून कार्यरत आहे.

विशाल शंकर शिंदे (३५, पाटण, सध्या कापसाळ, चिपळूण) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. देवगडहून मुंबईकडे निघालेल्या आयशर ट्रकची पागनाका येथे समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक बसली.

यामध्ये विशाल शिंदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तो जागीच बेशुद्ध पडला होता. त्याला तात्काळ कामथे रुग्णालयात नेण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पंचनामा उशिरा पर्यंत सुरू होता. विशाल शिंदे हा चिपळूण आगारात एसटी चालक म्हणून काम करतो. कापसाळ येथील यामा शोरूम नजीक राहतो.

या घटनेची माहिती मिळताच एसटी कर्मचाऱ्यांनीही कामथे रुग्णालयाकडे धाव घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *