Breaking News
चिपळूण : सावर्डेतील 13 वर्षीय अपहरण झालेल्या मुलीचा मुंबईत शोध, संबंधित युवक पोलिसांच्या ताब्यात, चार दिवसांच्या शोधमोहिमेनंतर रत्नागिरी पोलिसांना यश; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची विशेष पथके मुंबईत दाखल, मुलगी सुरक्षित रत्नागिरी : रस्त्यावर फिट आल्याने 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू, उपचारादरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्राणज्योत मालवली संगमेश्वर : मार्लेश्वर दर्शनाला आलेल्या सहा वर्षीय चिमुकलीचा दगड डोक्यात पडून मृत्यू, दोघे जखमी रत्नागिरी : डायलिसिस सेवा बंद करण्याचा प्रयत्न केल्यास कंपनीवर कारवाई करणार उदय सामंतांचा इशारा, रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही डायलिसिस केंद्रे सुरू राहणार चिपळूण : प्रशांत यादव यांच्या ‘स्वामिनी’ निवासस्थानी भाजपचा दिवाळी स्नेहमेळावा, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थितीखेर्डी येथे दिवाळी फराळाचे आयोजन, स्नेहबंध दृढ करत अनौपचारिक संवादातून साधला संवाद

रत्नागिरी : दाम्पत्याने घरातच सुरु केले ‘आपले वाचनालय’

banner 468x60

रत्नागिरीतील दाम्पत्य संजय कुळये आणि मुग्धा कुळये या दांपत्याने स्वतःच्या घरातच आपले वाचनालय सुरु केले आहे. ग्रामीण भागातील वाचकांना पुस्तके वाचायला मिळत नाहीत.

🔴 कोकणातील सर्व बातम्या पाहण्यासाठी Kokan Katta Live .. YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE

चैनलला subscribe करा आणि आवडल्यास व्हीडिओ जरूर शेअर करा

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

पुस्तके विकत घेऊन वाचण्याएवढी आर्थिक परिस्थिती नसते. अशावेळी राजापूर तालुक्यातील कोंडीवळे गोतावडेवाडीत मोफत वाचनालय सुरु करून एक नवा पायंडा घालून दिला आहे. संजय कुळये आणि मुग्धा कुळये हे दोघेही कवी आहेत.

त्यांना वाचनाची प्रचंड आवड आहे. वाचनाच्या आवडीमुळे त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पुस्तकांचा संग्रह निर्माण झाला. ही संग्रहित झालेली पुस्तके पुन्हा इतरांना वाचायला मिळावीत या उद्देशाने कोंडीवळे गावात त्यांनी आज गोपाळकालाच्या मुहूर्तावर आपले वाचनालय सुरु केले.

. आपल्या घरातच त्यांनी हे वाचनालय सुरु केले असून गावातील वाचकांना मोफत पुस्तके वाचायला मिळणार आहेत. कुळये दांपत्याकडे असलेली 300 पुस्तके आणि खजिना बाल वाचनालय या संस्थेकडून मिळालेली 100 हून अधिक पुस्तके सध्या वाचनालयात उपलब्ध आहेत कथा कविता कादंबऱ्या, आत्मचरित्र, धार्मिक, अध्यात्मिक, वैज्ञानिक, व्याकरण, वैचारिक, शब्दकोश अशी विविध पुस्तके वाचनासाठी मोफत उपलब्ध होणार आहेत.


आपल्या वाचनालयात दर मंगळवार आणि शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेत वाचकांना पुस्तके उपलब्ध होणार आहेत. वाचकांनी स्वतःची नोंद करुन पुस्तक वाचण्यासाठी घरी घेऊन जायचे आहे.

वाचून झाले की परत ते पुस्तक वाचनालयात जमा करायचे आहे. हे वाचनालय सर्व वाचकांसाठी खुले राहणार आहे. आज वाचनालयाच्या शुभारंभाप्रसंगी काही वाचकांनी पुस्तके वाचायला घेतली.

यावेळी चंद्रकांत जानसकर, नंदकुमार गोतावडे, प्रदीप कुळये, चिन्मय कुळये, सुवर्णा कुळये, गार्गी कुळये, सुरेश कुंभार, सरीता कुंभार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजामध्ये वाचनसंस्कृती रुजावी, सुजाण, सुसंस्कृत नागरीक घडावेत या हेतूने आज आपल्या मुलीच्या वाढदिवसादिवशीच आपले वाचनालय सुरु केल्याचे मुग्धा कुळये यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *