Breaking News
दापोली : दापोली वक्फ जमीन व्यवहाराला नवे वळण, जमीन व्यवहार प्रकरणी दापोली उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांची बाजू समोर, ‘माझे सर्व कागदपत्रे क्लिअर, वक्फ बोर्डाच्या जमिनीचे खरेदीखत होत नाही, मी जागा पाहून घेतली’ – खालिद रखांगे यांची कोकण कट्टा न्यूजला माहिती राजापूर : गवतात पडलेल्या महावितरणच्या विजेच्या तारेला स्पर्श, शेतकऱ्याचा जागीच मृत्यूमहावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात ग्रामस्थ संतप्त रत्नागिरी : भरधाव ॲक्टिव्हाची महिलेला जोरदार धडक, गंभीर जखमी करून चालक पसार गुहागर : ग्रामदेवतेच्या मंदिरातून 32 हजारांचे दोन अॅम्प्लिफायर चोरीला राजापूर : दिवसा घरफोडी, कुलूप तोडून 12 हजारांचे चांदीचे साहित्य लंपास

लांजा : महामार्गावर टेम्पो उलटला, चालकासह क्लिनर जखमी

banner 468x60

तीव्र उतारावरील वळणावर वाहनावरील ताबा सुटून आयशर टेम्पाे उलटून अपघात झाल्याची घटना गुरुवारी (७ सप्टेंबर) सकाळी ६:३० वाजता मुंबई-गाेवा महामार्गावरील आंजणारी (ता. लांजा) येथे घडली.

🔴 कोकणातील सर्व बातम्या पाहण्यासाठी Kokan Katta Live .. YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE

चैनलला subscribe करा आणि आवडल्यास व्हीडिओ जरूर शेअर करा

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

या अपघातात चालक रफिक बादशहा लतिफ आणि क्लिनर सत्यवान संजीव मोरे हे दोघे जखमी झाले आहेत.रफिक बादशहा लतिफ हा आयशर टेम्पो (जीए ०४, टी ६५६८) प्लास्टिकचे बॅरल घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात हाेता. आंजणारी घाट उतरून काजळी नदीवरील पूल ओलांडण्यापूर्वीच वळणावर टेम्पो उलटला.

अपघातानंतर टेम्पो चालक रफिक लतिक केबीनमध्येचे अडकून पडला होता. अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळतात लांजा पोलिस स्थानकाचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण देशमुख सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.

त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने टेम्पोमध्ये अडकून पडलेल्या चालकाला बाहेर काढण्यात आले. चालक रफिक लतिक याच्यासह क्लिनर सत्यवान संजीव मोरे हा किरकोळ जखमी झाला. अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *