कोकण : खासगी ट्रॅव्हल्सने जास्त भाडं घेतलं तर करा तक्रार 

banner 468x60

गणेशोत्सव आता अगदी काही दिवसांवर आला आहे. यासाठी मुंबईतून गावाला जाण्याची तयारी चाकरमानी करू लागले आहेत. कोकण ते मुंबई व मुंबई ते कोकण तसेच पुणे या मार्गावर खाजगी प्रवासी ट्रॅव्हल्स सेवा पुरवत असतात. 

 🔴 कोकणातील सर्व बातम्या पाहण्यासाठी Kokan Katta Live .. YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE

चैनलला subscribe करा आणि आवडल्यास व्हीडिओ जरूर शेअर करा

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

याच कालावधीत गर्दीचाहंगाम लक्षात घेत खाजगी ट्रॅव्हल्स व्यवसायिकांकडून अवास्तव तिकिटाचे दर आकारले जातात. मात्र या सगळ्यावर आता परिवहनविभागाचा अंकुश असणार आहे.

 यासाठी आता जिल्हा परिवहन अधिकाऱ्यांकडून दर निश्चित करण्यात आले असून या दरापेक्षा 50 टक्के अधिक दरांची आकारणी झाल्यास थेट व्हॉट्सअॅपवर तक्रार करण्याचं आवाहन रत्नागिरी जिल्हा परिवहन विभागाकडूनकरण्यात आलं आहे. 

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणाने दरपत्रक ठरवून दिले आहेत. कोणत्याहीखासगी बस वाहतूकदाराने या दराच्या ५० टक्के अधिक (दीडपट) आकारणी करण्यास परवानगी असून, या दराच्या दीडपटापेक्षाजास्त भाडे आकारणी झाल्यास प्रवाशांनी ०२३५२–२२५४४४ या व्हॉटसॲप क्रमांकावर वाहन, वाहनाचा नोंदणी क्रमांक व भाडेआकारणी तिकीट यांच्या फोटोसह तक्रार नोंदवावी, असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनी केलेआहे.

 प्रवासाचा मार्ग रत्नागिरी ते मुंबई अनुक्रमे तिकीट– साधे ५२५ रुपये, शिवशाही (वातानुकुलित) ८१५ रुपये, शयनयान (विनावातानुकुलित) ७१० रुपये. रत्नागिरी ते ठाणे – ५०५ रुपये, ७५० रुपये, ६९० रुपये. रत्नागिरी ते बोरीवली – ५५० रुपये, ८१५ रुपये, ७५० रुपये. रत्नागिरी ते पुणे/पिंपरी – ४९० रुपये, ७२५ रुपये, ६६५ रुपये. चिपळूण ते मुंबई – ३९० रुपये, ५८५ रुपये, ५३५ रुपये. चिपळूण ते पुणे – ३६० रुपये, ५३० रुपये, ४८५ रुपये. दापोली ते मुंबई – ३५० रुपये, ५२० रुपये, ४७५ रुपये. दापोली ते ठाणे – ३६०रुपये, ५३० रुपये, ४८५रुपये. दापोली ते बोरोवली – ३७५ रुपये, ५५५ रुपये, ५१० रुपये आणि दापोली ते पुणे/पिंपरी – ३५० रुपये, ५२० रुपये, ५७५ रुपये प्रादेशिक परिवहन प्राधिकरणने शेअर रिक्षा थांबे व दरपत्रक देखील ठरवून दिलेले आहेत. 

त्यानुसारचप्रवाशांनी भाडे द्यावे असे आवाहन रत्नागिरी जिल्हा परिवहन विभागाकडून करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *