Breaking News
चिपळूण : सावर्डेतील 13 वर्षीय अपहरण झालेल्या मुलीचा मुंबईत शोध, संबंधित युवक पोलिसांच्या ताब्यात, चार दिवसांच्या शोधमोहिमेनंतर रत्नागिरी पोलिसांना यश; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची विशेष पथके मुंबईत दाखल, मुलगी सुरक्षित रत्नागिरी : रस्त्यावर फिट आल्याने 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू, उपचारादरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्राणज्योत मालवली संगमेश्वर : मार्लेश्वर दर्शनाला आलेल्या सहा वर्षीय चिमुकलीचा दगड डोक्यात पडून मृत्यू, दोघे जखमी रत्नागिरी : डायलिसिस सेवा बंद करण्याचा प्रयत्न केल्यास कंपनीवर कारवाई करणार उदय सामंतांचा इशारा, रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही डायलिसिस केंद्रे सुरू राहणार चिपळूण : प्रशांत यादव यांच्या ‘स्वामिनी’ निवासस्थानी भाजपचा दिवाळी स्नेहमेळावा, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थितीखेर्डी येथे दिवाळी फराळाचे आयोजन, स्नेहबंध दृढ करत अनौपचारिक संवादातून साधला संवाद

रत्नागिरी : साळवी स्टॉप येथे तिहेरी अपघातात दोघे जखमी

banner 468x60

शहरातील साळवी स्टॉप येथे मोटार- रिक्षा व दुचाकी असा तिहेरी अपघात झाला. या अपघातात रिक्षाचालक व दुचाकीस्वार जखमी झाले.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

रिक्षाचालकाला गंभीर दुखापत झाली असल्याचे बोलले जात आहे. शहर पोलिस ठाण्यात मोटार चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षाचालक रियाज अहमद शेगळे (रा. टी. जी. शेट्येनगर,

रत्नागिरी ) व दत्ताराम सदानंद सुर्वे (५८, रा. भाटये जोयनाकवाडी रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना गुरुवारी (ता. ३१) रात्री साळवी स्टॉप येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्ताराम सुर्वे हे गुरुवारी रात्री कामावरून दुचाकीने भाटये येथे घरी जात होते.

रात्री पावणेबाराच्या सुमारास ते साळवी स्टॉप येथे आले असता त्यांच्यासमोर असलेली रिक्षा हिला मोटारीने समोरून धडक दिली. या अपघातात रिक्षा मागे येऊन दुचाकीवर धडकली. या अपघातात दुचाकीवरील दत्ताराम सुर्वे हे रस्त्यावर पडून जखमी झाले.

रिक्षाचालक रियाज शेगळे यांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर जखमींना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघात प्रकरणी दुचाकीस्वार दत्ताराम सुर्वे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

तक्रारीवरुन पोलिसांनी निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी मोटार चालक श्वेतांग प्रदीप वायंगणकर (रा. खेडशी- गयाळवाडी, रत्नागिरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *