Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरी : ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख सुधीर मोरे यांचा मृतदेह सापडला! घातपाताचा संशय

banner 468x60

रत्नागिरी उबाठा सेनेचे जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख सुधीर सयाजी मोरे यांचे निधन झाले आहे. त्यांचा मृतदेह घाटकोपर रेल्वे स्थानकानजीक रुळांवर आढळून आला.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास सुधीर मोरे यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत रेल्वे ट्रॅकवर मिळाला. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आलेले नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार, सुधीर मोरे गुरुवारी रात्री आपल्या अंगरक्षकांना बैठकीला जायचे आहे, असे सांगून बाहेर पडले. त्यांनी यावेळी आपल्यासोबत कोणालाही घेतले नव्हते. यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास घाटकोपर रेल्वे स्थानकातील फास्ट ट्रॅकवर त्यांचा मृतदेह सापडला.

त्यांच्या मृत्यूविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. परंतु, अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. दुपारी दोन वाजता सुधीर मोरे यांच्या निवासस्थानावरुन त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *