Breaking News
दापोली : दापोली वक्फ जमीन व्यवहाराला नवे वळण, जमीन व्यवहार प्रकरणी दापोली उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांची बाजू समोर, ‘माझे सर्व कागदपत्रे क्लिअर, वक्फ बोर्डाच्या जमिनीचे खरेदीखत होत नाही, मी जागा पाहून घेतली’ – खालिद रखांगे यांची कोकण कट्टा न्यूजला माहिती राजापूर : गवतात पडलेल्या महावितरणच्या विजेच्या तारेला स्पर्श, शेतकऱ्याचा जागीच मृत्यूमहावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात ग्रामस्थ संतप्त रत्नागिरी : भरधाव ॲक्टिव्हाची महिलेला जोरदार धडक, गंभीर जखमी करून चालक पसार गुहागर : ग्रामदेवतेच्या मंदिरातून 32 हजारांचे दोन अॅम्प्लिफायर चोरीला राजापूर : दिवसा घरफोडी, कुलूप तोडून 12 हजारांचे चांदीचे साहित्य लंपास

खेड : खालिद चौगुले यांचा खिदमत पुरस्काराने गौरव

banner 468x60

बहिरवली येथील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या खालिदभाई चौगुले यांना ‘खिदमत पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक व कलाक्षेत्रात विशेष काम केले आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

बेघरांना आसरा, शिक्षणात पाठीमागे राहिलेल्यांना पुढचे पाऊल दाखवणे तर परिस्थितीत बेजार झालेल्यांना रस्ता दाखवणे अशी सामाजिक कार्य त्यांनी आतापर्यंत केली आहेत. शिक्षण, समाजसेवा याच्या जोडीला त्यांनी ‘पाणी म्हणजे जीवन’ हे ब्रीदवाक्य गेल्या काही वर्षांपासून अंगीकारले आहे.

कोकणातील जल फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून ते काम करत आहेत. ग्रामीण भागातील वाडीवस्तीत पिण्याच्या पाण्याची सोय ते करून देत आहेत.

खेड एसटी स्थानकाच्या विंधन विहिरीचा जटिल प्रश्न त्यांच्याकडे आला होता. त्या व्यक्तीने कोणताही विचार न करता अध्यक्ष नितीन जाधव यांच्यासह सहकारी वर्गाला सोबत घेऊन सोडवला.
‘समाजसेवा हीच ईश्वरसेवा’ अशी मनाशी खुणगाठ बांधून समाजसेवेच्या पालखीचे भोई ते बनून काम करत आहेत. त्यांना कोकण समाज संस्था कौसा मुंब्रा यांच्याकडून ‘खिदमत पुरस्कार’ देऊन गौरवले आहे.

शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *