तालुक्यातील ओरी येथे गोठ्यामध्ये मित्रांसोबत खेळताना पडल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. पारस प्रदीप घवाळी (12, ऱा ओरी, घवाळीवाडी) असे मृताचे नाव आहे.
🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy
YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE
👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर संपर्क करा 9960151909
या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पारस हा ओरी येथे सोमवारी दुपारी गुरांच्या गोठ्यामध्ये मित्रांसोबत खेळत होता. यावेळी खेळता-खेळता खाली पडला.
यावेळी त्याला उलटी झाल्याने मित्रांनी त्याला पाणी प्यायला दिले. यानंतर पारस हा आपल्या घरी आला होता . घरी आल्यानंतर पारस याला पून्हा अस्वस्थ वाटू लागले व तो अचानक बेशुद्ध झाला .
यावेळी नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र जाकादेवी येथे दाखल केले. पारस याची प्रकृती चितांजनक बनल्याने जाकादेवी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालय याठिकाणी जाण्याचा सल्ला दिल़ा त्यानुसार पारस याला रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता पारस याचा मृत्यू झाला .
अशी नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आह़े.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















