Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

राजापूर : मार्चपासून शबीना पटेल बेपत्ता

banner 468x60

शांत समजल्या जाणाऱ्या कोकणात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं पाहायला मिळत आहे. नीलिमा चव्हाण हिच्या प्रकरणाने कोकणाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलाय हे नक्की आहे. मुलींचं आणि महिलांचं बेपत्ता होणे हत्या चोरी अश्या घटना सऱ्हास कोकणातील गाववाडीत घडू लागले आहेत.

राजापूर शहरातील गुळीकर मोहल्ला येथील ४० वर्षीय महिला शबीना इक्बाल पटेल या १५ मार्च २०२३ पासून बेपत्ता असल्याची तकार राजापूर पोलीस ठाण्यात हनिफ नाईक यांनी दिली आहे.

मात्र या तक्रारीचं पुढे काय झालं हे अजूनही अनुत्तरित आहे. शबीना पटेल या घरातून बेपत्ता झाल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी सर्व शोध घेतला मात्र त्या सापडल्या नसल्याने अखेर राजापूर पोलीस स्थानकांत तकार देण्यात आली. सुमारे पाच फुट उंच असलेल्या पटेल यांनी पंजाबी ड्रेस परिधान केला होता.

दि. १५ मार्चला त्या दुपारी घरातून बाहेर पडल्या त्या अद्यापपर्यंत घरी आलेल्या नाहीत. शबीना इक्बाल पटेल या थोड्या मानसिक रुग्ण असल्याचीही माहिती नातेवाईकांनी दिली असल्याची माहिती समोर येतेय. ही माहिती राजापूर पोलीस ठाण्यामधून देण्यात आली. दरम्यान, या संदर्भात माहित मिळाल्यास राजापूर पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *