Breaking News
दापोली : दापोलीत मोठा जमीन घोटाळा? वक्फ जमिनींच्या व्यवहारांना वक्फ मंडळाची नोटीस, जमिनींच्या व्यवहारांचा पर्दाफाश होणार? एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या कनेक्शनमुळे प्रकरण चर्चेत, 44 जणांना नोटीस, 7 दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश रत्नागिरी : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची चौथ्या मजल्यावरून उडी, पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा, ‘माहेरून फ्लॅट घेण्यासाठी पैसे आणावेत, अन्यथा मुलाचा दुसरा विवाह करून देऊ’, मुलांपासून दूर ठेवल्याचा तक्रारीत आरोप पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांची एकजूट, ‘सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना रत्नागिरी : ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर यांचे निधन,पत्रकारिता, सहकार क्षेत्रात हळहळ धक्कादायक खेडमध्ये दोन तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल

देवरुख : एस टी महामंडळाची बदनामी केल्याप्रकरणी चालकाचे निलंबन

banner 468x60

एस टी महामंडळाच्या देवरुख आगारातील चालक अमित आपटे यांचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलंय कि देवरुख-पुणे आणि देवरुख-अर्नाळा या गाड्या नादुरुस्त आहेत त्यामुळे प्रवाशांनी याचा प्रवास टाळा.

गेल्या दोन तीन महिन्यात तक्रारी करूनही येथील आगार व्यवस्थापक प्रवाशांच्या जीवाशी खेळतोय असे या व्हिडीओत म्हटले आहे.

यामुळे प्रवाशांत घबराट पसरल्यावर एस टी च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घेत व्हिडीओत दावा केलेल्या प्रत्येक गोष्टीची चौकशी करण्याचे आदेश विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिले आहेत.

शिवाय एस टी महामंडळाची बदनामी करीत प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत या चालकाचे निलंबन देखील करण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक बोरसे यांनी दिली आहे. या चालकाने कोरोना काळात देखील असे खोडसाळ व्हिडीओ केले होते असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *