दापोली उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदांसाठी स्वातंत्र्यदिनी मराठी पत्रकार परिषद मुंबईच्या दापोली शाखेतर्फे केलेले उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले.
🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy
👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर संपर्क करा 9960151909
जिल्हा शल्य चिकित्सक व दापोली तहसीलदार यांनी रिक्त पदांबाबत लोकप्रतिनिधीसमवेत मंत्रालयात पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्यामुळे उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दापोली उपजिल्हा रुग्णालयात अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून एकही कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी येथे कार्यरत नाहीत. या रुग्णालयात जनरल सर्जन, एमडी मेडिसीन, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ, अस्थिरोगतज्ञ, नेत्ररोगतज्ञ आदी पदे रिक्त असून ही पदे पूर्णवेळ भरली जावीत, ही मराठी पत्रकार परिषदेची मागणी आहे.
यासाठी यापूर्वी २६ जानेवारीला मराठी पत्रकार परिषद शाखा दापोलीच्यावतीने बेमुदत उपोषण करण्यात आले होते; मात्र रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत व आमदार योगेश कदम यांनी ही पदे भरण्याबाबत आश्वासित केल्याने त्या वेळी उपोषण स्थगित करण्यात आले होते.
त्यानंतर याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने १५ ऑगस्टपासून पुन्हा उपोषण करणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार दापोलीतील उपजिल्हा रुग्णालयासमोर मराठी पत्रकार परिषद मुंबई शाखा दापोलीचे सदस्यांनी उपोषण सुरू केले. या उपोषणाची दखल घेऊन दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोंबे यांनी पत्रकारांची भेट घेऊन रुग्णालयातील रिक्त पदांबाबत वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.
तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एम. गावडे यांनी रिक्त पदांबाबत वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगितल्याने हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















