Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरी : अल्ट्राटेक सिमेंट कंपनीची वाहतूक बंद

banner 468x60

अल्ट्राटेक सिमेंट कंपनीमधून (Ultratech Cement Company) सिमेंटची वाहतूक करणाऱ्‍या ट्रकना ठरलेले भाडे मिळत नाही.

वाढत्या महागाईमुळे त्रस्त ट्रकमालकांनी आजपासून (ता. २३) सिमेंट वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.यामुळे दीडशे ट्रक जागेवर उभे राहणार आहेत. या ठिकाणाहून चुकीच्या पद्धतीने वाहतूक करण्याचा कुणी प्रयत्न केला तर संघर्ष अटळ आहे, असा इशारा रत्नागिरी जिल्हा मोटारमालक असोसिएशनने दिला आहे.

रत्नागिरी एमआयडीसीतील (Ratnagiri MIDC) अल्ट्राटेक सिमेंट कंपनीमधून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व अन्य ठिकाणी सिमेंटची वाहतूक होते; मात्र गेल्या काही महिन्यापासून युनियनने ठरवलेले भाडे कंपनीकडून मिळत नसल्याचे ट्रकमालकांमध्ये संताप पसरला आहे.

त्यामुळे यापुढे जेवढा माल तेवढेच भाडे मिळावे यांसह अनेक मागण्या युनियनकडून केल्या आहेत. विशेषत: ४० टनापेक्षा अधिक वाहतूक करणाऱ्‍या मोठ्या गाड्या बंद करण्यात याव्यात व स्थानिक गाड्यांना प्राधान्य देण्यात यावे, अशी प्रमुख मागणी आहे. कंपनीमध्ये नव्याने आलेले अधिकारी हे चालकांच्या समस्या ऐकून घेत नाहीत.

त्यामुळेही वाहतूकदारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. कंपनीच्या पार्टीने गाडी खाली करून घेतली नाही तर ७०० रुपये भत्ता आणि दुसऱ्‍या दिवशी खाली केली तर २ हजार रुपये भरपाई मिळावी. युनियनला नोंदणी झाल्याशिवाय नवीन गाड्यांना परवानगी देण्यात येऊ नये यांसह अनेक मागण्या असोसिएशनने निवेदनाद्वारे कंपनीकडे केल्या आहेत.

याबाबत वेळोवेळी कंपनीच्या अधिकाऱ्‍यांशी असोसिएशनने संवाद साधण्याचा प्रयत्न केला; परंतु कंपनीच्या अधिकाऱ्‍यांशी फारसा प्रतिसाद दिला नसल्याचे असोसिएशनने सांगितले. वाहतूकदारांबाबत योग्य निर्णय होत नसल्याने आजपासून (ता. २३) रत्नागिरी जिल्हा मोटरमालक असोसिएशनने सिमेंट वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *