दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील 10 विद्यार्थी आणि दोन प्राध्यापक ऑस्ट्रेलिया येथील सिडनीस्थित वेस्टर्न सिडनी विद्यापीठात दाखल झाले आहेत.
🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर संपर्क करा 9960151909
त्यांचा एक महिन्याचा अभ्यासदौरा असून प्रगतशील कृषी तंत्रज्ञान आणि कृषी उद्योजकता विकास या बाबतीतील धडे गिरवायला त्यांनी सुरुवात केली आहे. विद्यापीठ राबवत असलेल्या भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली संचलित राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाच्या अंतर्गत परदेश प्रशिक्षण घेणारी ही पहिली तुकडी आहे.
कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रकल्पप्रमुख तथा शिक्षण संचालक डॉ. प्रशांत बोडके यांच्या नेतृत्वात या प्रशिक्षणाची उत्साहात सुरुवात झाली आहे. त्यांच्यासह आणखी दोन प्राध्यापक डॉ विनायक पाटील व डॉ वैभव राजे महाडिक हे विद्यार्थ्यांसोबत अध्ययन करत आहेत तर नंतर डॉ भावे , डॉ. बोडके, डॉ सावर्डेकर व डॉ परूळेकर हे काही दिवसांनी या ठिकाणी दाखल होऊन विद्यापीठ स्तरावरील एकत्रित शिक्षण आणि संशोधन कार्यक्रमांचे नियोजन करणार आहेत.
या विद्यार्थ्यांचे ऑस्ट्रेलियात आणि खास करून सिडनीत स्थायिक झालेल्या मराठी कुटुंबांनी मोठ्या आस्थेने स्वागत केले आहे. प्रथमच देशाबाहेर पडलेले हे विद्यार्थी महाराष्ट्राबाहेर सुद्धा क्वचितच गेलेले आहेत.
त्यामुळे या प्रगत राष्ट्रात राहताना नवीन वातावरणाशी, संस्कृतीशी जुळवून घेताना थोड्या अडचणी येणे साहजिक आहे. मुलांची राहण्याची व प्रवासाची उत्तम सोय कोकण कृषी विद्यापीठाने केली आहे.
तथापि इथली खाद्यसंस्कृती वेगळी असल्याने विद्यार्थी ते राहत असलेल्या घरातच आपल्या पाककृती एकत्रितपणे करून स्नेहभोजनाचा आनंद घेत आहेत.
प्रथमच परदेशात आपल्या कुटंबाशीवाय राहत असल्याने आईच्या जेवणाची आठवण येतेच. त्यामुळे विद्यापीठाने पुरेसे विद्यावेतन दिलेले असूनही आईचे घरगुती जेवणाची सर नाही.
पण ही उणीव ही सिडनी स्थित मराठी कुटूंबानी आई वडीलांची जागा घेत या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रीयन घरगुती जेवण देण्यासाठी सगळयांनी पाहुणचारच्या आमंत्रणाचा वर्षाव केला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















