Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दोपोली : 4 ठिकाणी घर फोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज केला लंपास

banner 468x60

दापोली शहरातील वेगवेगळ्या चार ठिकाणी घरफोडी करून चोरट्याने डल्ला मारला आहे. प्रभू आळी येथील बंद कर फोडून सुमारे 1 लाख 56 हजाराचा ऐवज चोरट्याने लंपास केला आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

यातील प्रभूआळी या ठिकाणी झालेल्या घरफोडीची घटना 15 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:00 ते 16 ऑगस्ट रोजी सकाळी 7:30 वाजण्याच्या दरम्यान घडली असून या चोरी प्रकरणी एका संशयितास ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेखर प्रधान (वय 62 रा. प्रभुआळी राम मंदिर) मुंबईला गेले असताना त्यांचे घर बंद होते. या बंद घरात कोणीतरी अज्ञात इसमाने चोरीच्या उद्देशाने घराच्या दाराची कडी कोंडा तसेच लॉक हत्याराने तोडून घरात प्रवेश केला.

घरातील बेडरूममध्ये असणाऱ्या लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडून त्यामधील लॉकरमध्ये ठेवलेली सोन्याचे चांदीच्या वस्तू तसेच रोख रक्कम चोरट्याने लंपास केली.

याप्रकरणी रत्नागिरी येथून पोलीस पथक तसेच कस्टम डिपार्टमेंटचे पथक व दापोली पोलीस स्थानकाचे पथक यांची शोध मोहीम सुरू आहे. याप्रकरणी दापोली पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विवेक आयरे अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *