Breaking News
चिपळूण : डॉ. यतीन जाधव आणि डॉ. वैशाली जाधव यांचा गौरव; एबीपी माझा ‘आरोग्यरत्न’ पुरस्काराबद्दल विशेष कौतुक सोहळा, चिपळूणमधील तीन वाचनालयांचा संयुक्त पुढाकार BREAKING चिपळूण हल्ला प्रकरण : सर्व संशयित आरोपींची नावं समोर, प्रेमविवाहाचा राग मनात धरून एकाच कुटुंबातील पाच जणांवर जीवघेणा हल्ला, सात जणांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा, कोयता, रॉड आणि काठ्यांनी सपासप वार दापोली : स्कूल बसला कारची धडक, सुदैवाने विद्यार्थी सुखरूप, दोन्ही वाहनांचे नुकसान चिपळूण : गोवा बनावटीची दारू जप्त, 40 बॉक्ससह इनोव्हा जप्त संगमेश्वर : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी वारंवार शारीरिक संबंध, 20 वर्षीय तरुणाविरुद्ध देवऱुख पोलिसांत गुन्हा दाखल

चिपळूण : डॉ. यतीन जाधव आणि डॉ. वैशाली जाधव यांचा गौरव; एबीपी माझा ‘आरोग्यरत्न’ पुरस्काराबद्दल विशेष कौतुक सोहळा, चिपळूणमधील तीन वाचनालयांचा संयुक्त पुढाकार

banner 468x60

चिपळूण येथील सुप्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ आणि स्प्रिंग स्किन अँड कॉस्मेटोलॉजी लेझर क्लिनिकचे संचालक डॉ. यतीन जाधव व डॉ. वैशाली जाधव यांना प्रतिष्ठेचा एबीपी माझा ‘आरोग्यरत्न’ पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, बाबासाहेब आंबेडकर वाचनालय आणि विभा अरविंद ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा गौरव सोहळा खेड येथील विभा अरविंद ग्रंथालयाच्या कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

डॉ. यतीन जाधव आणि डॉ. वैशाली जाधव यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासह शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याची दखल घेत या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ साहित्यिक प्रकाशकाका देशपांडे यांच्या हस्ते जाधव दाम्पत्याचा शाल, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी मनोगत व्यक्त करताना विभा अरविंद ग्रंथालयाचे अध्यक्ष बापूसाहेब काणे यांनी जाधव दाम्पत्याच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, आपल्या डॉक्टरांचे कर्तृत्व एवढे मोठे आहे की, त्यांना मिळालेल्या आरोग्यरत्न पुरस्काराचाच खऱ्या अर्थाने सन्मान झाला आहे, असे अभिमानाने म्हणावे लागेल. आई-वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांची शिदोरी आणि त्यातून घेतलेल्या प्रेरणेच्या बळावर डॉ. यतीन जाधव व डॉ. वैशाली जाधव वैद्यकीय क्षेत्राबरोबरच शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही सातत्याने योगदान देत आहेत. त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडतात, असेही त्यांनी नमूद केले.

यानंतर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत यांनीही जाधव दाम्पत्याच्या कार्याचा गौरव केला. ‘शुद्ध बीजापोटी रसाळ गोमटी’ या उक्तीप्रमाणे त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य असल्याचे सांगत उत्तम संस्कार, सेवाभाव आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यांचा सुंदर संगम त्यांच्या कार्यातून दिसून येतो, असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

या सोहळ्याला विभा अरविंद ग्रंथालयाचे अध्यक्ष बापूसाहेब काणे, बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत, लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष धनंजय चितळे, कोषाध्यक्ष सुबोध दीक्षित, राम दांडेकर, अभिजीत देशमाने, मानसी पटवर्धन, विनायक ओक, मनीषा दामले, रेखा देशपांडे, विभा अरविंद ग्रंथालयाच्या संचालिका मेधा बेटकर, सोमण, सुहास चव्हाण, ग्रंथालयाच्या सल्लागार गौरी भोसले, कार्यवाह विजय कदम, पत्रकार राजेश जोष्टे, प्रदीप पवार, ॲक्सिस बँकेचे अधिकारी अमित रहाटे व विवेक शिंदे, सीए सुमेध करमरकर, संजय पोकळे, सीताराम पडते, मेहंदी बेबल, श्रिया खानविलकर, अशोक जाधव, अविनाश पाणकर, राजेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

वैद्यकीय क्षेत्रात रुग्णसेवा बजावत असतानाच सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही योगदान देणाऱ्या डॉ. यतीन जाधव व डॉ. वैशाली जाधव यांच्या कार्याचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला. चिपळूणमधील तीन वाचनालयांनी एकत्र येत आयोजित केलेल्या या कौतुक सोहळ्यामुळे जाधव दाम्पत्याच्या कार्याला साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातूनही सन्मानाची पावती मिळाली.