Breaking News
रत्नागिरी : कोस्टगार्डच्या बांधकाम कामातून 8 लाखांची फसवणूक झाल्याचा आरोप, नाशिकच्या कंपनी मालकासह चौघांवर गुन्हामहिला कंत्राटदाराची 80 लाख 17 हजारांची थकबाकी, करार रद्द न करता दुसऱ्या कंपनीला काम दिल्याची तक्रार चिपळूण : घरात घुसून वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचा हार हिसकावला, 1.80 लाखांचा ऐवज लंपास संगमेश्वर : तुळशी विवाहाच्या कार्यक्रमात दोन गटांत राडा, परस्परविरोधी गुन्हे दाखल, सामाईक जमिनीच्या वादातून दोन गट आमनेसामने रत्नागिरी : भरधाव दुचाकीची 11 वर्षीय मुलीला धडक, मुलगी जखमी, दुचाकी चालकाविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल संगमेश्वर : साखरपा स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणी डॉ. विजय नारकरसह तिघांवर गुन्हा, 16 ते 18 आठवड्यांच्या गर्भपाताचा आरोप, डॉक्टर आणि महिलेच्या पतीला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

रत्नागिरी : भरधाव दुचाकीची 11 वर्षीय मुलीला धडक, मुलगी जखमी, दुचाकी चालकाविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

banner 468x60

रत्नागिरी शहरातील चंपक मैदान येथे सुरू असलेल्या फन फेअर यात्रेच्या पार्किंगमधून बाहेर पडताना भरधाव वेगाने दुचाकी चालवून एका ११ वर्षीय मुलीला मागून धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात मुलगी जखमी झाली असून, दुचाकी चालकाविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २१ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद कैफ इकबाल मुल्ला (वय २३, रा. समीरा अपार्टमेंट, राजापूरकर कॉलनी, उद्यमनगर, रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील टीव्हीएस एन्टॉर्क दुचाकीवरून (एमएच ०८ बीएम ३१०३) एका मित्राला मागे बसवून फन फेअरच्या पार्किंगमधून बाहेर पडत होता.
यावेळी पार्किंगमधून बाहेर जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर परिसरातील गर्दी आणि रस्त्याची स्थिती लक्षात न घेता त्याने दुचाकी भरधाव व निष्काळजीपणे चालविल्याचा आरोप आहे.

त्याचवेळी रस्त्यावरून पायी जात असलेल्या मैत्रेयी निलेश आंबेरकर (वय ११, रा. गणाधीश अपार्टमेंट, फाटक हायस्कूलजवळ, गाडीतळ, रत्नागिरी) हिला दुचाकीची मागून धडक बसली.
या धडकेत मैत्रेयी जखमी झाली. घटनेनंतर या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
फन फेअर यात्रेसारख्या गर्दीच्या ठिकाणी वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून अधिक काळजी घेणे आवश्यक असल्याचे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे