तालुक्यातील हर्णे नवानगर येथे समुद्रकिनारी सोमवारी सायंकाळच्या सुमारास चरसाची आठ पाकिटे सापडली असून, त्याचे अंदाजे वजन आठ किलो आहे, दापोली पोलिसांच्या किनाऱ्यावरील गस्ती दरम्यान ही पाकिटे सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर संपर्क करा 9960151909

मुरुड समुद्रकिनारी सोमवारी (ता. १४) चारसाची १५ पाकिटे केवड्याच्या बनात आढळली होती, त्यानंतर दापोली पोलिसांनी परिसरातील समुद्रकिनारी आणखी काही पाकिटे समुद्रातून वाहून आल्याची शक्यता लक्षात घेऊन समुद्रकिनाऱ्यावर तपासणीची मोहीम राबविली.
या मोहिमेत हर्णै नवानगर परिसरात आठ चरसाची पाकिटे पथकाला सापडली असून, त्याचा पंचनामा करून ती जप्त केली. पुढील काही दिवस ही मोहीम सुरूच ठेवणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विवेक आहिरे यांनी दिली आहे.
गुजरात समुद्रकिनारीही असाच प्रकारची चरसाची पाकिटे आढळली असून, गस्ती पथकाला घाबरून ही चरसाची पाकिटे समुद्रात टाकल्याची शक्यता आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















