दापोली तालुक्यातील काळकाईकोंड-नांगरबाडी येथील २२ वर्षीय तरुणाचा मुंबई येथील केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हेमराज कुमार दिनेश मेहता (वय २२, रा. काळकाईकोंड-नांगरबाडी, ता. दापोली) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हेमराज यांना किडनीला सूज आल्याने उपचारासाठी दापोली येथील भागवत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती अधिक त्रासदायक झाल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई येथील केईएम रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला.
केईएम रुग्णालयात उपचार सुरू असताना २७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती दिली.
या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची करण्यात आली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













