Breaking News

रत्नागिरीच्या टीआरपी परिसरातून 39 वर्षीय महिला बेपत्ता, महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे नागरिकांना आवाहन

banner 468x60

रत्नागिरी शहरातील टीआरपी परिसरातून ३९ वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. शहरातील रेल्वे ब्रीज परिसरातील टीआरपी येथील रसवंती गृहाजवळून स्वाती एकनाथ म्हात्रे यांना पळवून नेल्याची फिर्याद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांकडून संबंधित महिलेचा शोध घेण्यात येत असून, तिच्याबाबत माहिती असलेल्या नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


स्वाती एकनाथ म्हात्रे (वय ३९, रा. शांतीनगर, रसाळवाडी, नाचणे, रत्नागिरी) असे बेपत्ता महिलेचे नाव आहे. त्या नववीपर्यंत शिकलेल्या आहेत. त्यांची उंची सुमारे पाच फूट असून, बांधा मध्यम आणि रंग सावळा आहे. त्यांचा चेहरा गोल असून डोळे व केस काळे आहेत. तसेच त्यांचे नाक सरळ आहे.
त्या बेपत्ता झाल्या त्यावेळी त्यांच्या पायात चप्पल होती. विशेष म्हणजे त्यांच्याकडे मोबाईल फोन नव्हता. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी नागरिकांकडून मिळणारी माहिती महत्त्वाची ठरणार आहे.


या महिलेबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास किंवा त्या कुठेही आढळून आल्यास तात्काळ रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
स्वाती म्हात्रे यांना शोधण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.