चिपळूण शहरातील बेदरकर आळी परिसरात एका ३८ वर्षीय तरुणाचा राहत्या खोलीत मृतदेह आढळून आल्याची घटना बुधवारी ११ नोव्हेंबर रोजी दुपारी उघडकीस आली. फुरकान इकबाल अली कापडी (वय ३८, रा. औदुंबर सोसायटी, ए विंग-२, बेदरकर आळी, चिपळूण) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फुरकान इकबाल कापडी हे औदुंबर सोसायटीतील ए विंग-२ मधील दुसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक २०३ मध्ये राहत होते. गेल्या दोन दिवसांपासून ते खोलीबाहेर पडले नसल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे त्यांच्या शेजारी राहणाऱ्या आनंद रामकृष्ण बंदरकर यांना संशय आला.
बुधवारी दुपारी सुमारे ३.४५ वाजण्यापूर्वी बंदरकर यांनी फुरकान यांच्या खोलीच्या दरवाजाची कडी वाजवून त्यांना हाक मारली. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. बराच वेळ आवाज देऊनही दरवाजा न उघडल्याने त्यांनी दरवाजावरील छिद्रातून आत डोकावून पाहिले. त्यावेळी फुरकान हे खोलीतील हॉलमध्ये अंथरुणावर निपचित पडलेल्या अवस्थेत दिसून आले.
हा प्रकार लक्षात येताच त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर फिर्यादी आणि पोलिसांच्या मदतीने फुरकान यांना तातडीने कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ६५/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ प्रमाणे करण्यात आली आहे. फुरकान यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दोन दिवसांपासून खोलीतच असलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास व आवश्यक कार्यवाही केली जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*