हर घर तिरंगा अभियान देशभर राबवण्यात येत आहे. याअंतर्गत भाजपा विधानसभा क्षेत्राध्यक्ष, माजी आमदार बाळ माने यांच्या नेतृत्वाखाली राजीवडा आणि मिरकरवाडा येथे मुस्लीम बंध-भगिनींना राष्ट्रध्वजाचे वितरण करण्यात आले.
🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर संपर्क करा 9960151909
लहान मुले व महिला, पुरुषांनी हे ध्वज सन्मानपूर्वक आपल्या घरावर लावू, असे सांगितले. भाजपाच्या वतीने सुमारे चारशे ध्वज राजीवडा येथे मौलाना अबुल कलाम आझाद नगरपालिका उर्दू शाळा क्र. १८ आणि मिरकरवाडा परिसरामध्ये वितरित करण्यात आले.
या कार्यक्रमाला भाजपा नेते बाळासाहेब माने, सौ. माधवी माने, मिहीर माने यांच्यासमवेत भाजपा अल्पसंख्यांक आघाडीचे उपाध्यक्ष मन्सूर मुकादम, अमित विलणकर प्रमुख उपस्थित होते.
रफिक शेख, जावेद म्हसकर, ताहिल कातलीकर, जैद सुवर्णदुर्गकर, जमीर सुवर्णदुर्गकर, अझर पाटील, फैय्याज हुनेरकर, अजमल हुनेरकर, सागर विलणकर आदी उपस्थित होते.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













