रत्नागिरी : 38 वर्षीय विवाहितेचे अपहरण; पतीची पोलिसांत धाव, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

banner 468x60

रत्नागिरी शहरातील जाकीमिऱ्या (आलावा), तळेकरवाडी परिसरातून ३८ वर्षीय विवाहितेचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे.. श्रावणी योगेश तांडेल असे अपहरण झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी महिलेचे पती योगेश भिकाजी तांडेल (वय ५१) यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास जाकीमिऱ्या (आलावा), तळेकरवाडी येथे ही घटना घडली. श्रावणी तांडेल या घरातून बाहेर गेल्या असताना अज्ञात व्यक्तीने त्यांना फूस लावून अज्ञात कारणावरून त्यांचे अपहरण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


या घटनेनंतर पती योगेश तांडेल यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४६२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १४० (३) प्रमाणे ८ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अपहरण झालेल्या श्रावणी तांडेल यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू असून, या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करीत आहेत.
श्रावणी तांडेल यांच्याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *