Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरी : एकाला ऑनलाइन 30 हजाराचा गंडा, गुन्हा दाखल

banner 468x60

टास्क पूर्ण केल्यावर पैसे मिळतील असे सांगून टास्कसाठी पैसे भरायला सांगून रत्नागिरीतील एकाला ३०,७२० रुपयांना गंडाघातल्याचा प्रकार समाेर आला आहे. हा प्रकार २० मार्च ते ३० मे २०२३ या कालावधीत रत्नागिरी शहरात घडला आहे. 

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

या प्रकरणीरत्नागिरी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरीतील एकाला ६२८२२९५४६२७९१ आणि६२८१५७२०२५९२७ या व्हाॅटसअप क्रमांकावरुन फाेन आला.

 तसेच टेलीग्रामवरुन चॅट करून एक टास्क आहे ताे पूर्ण केल्यावरपैसे मिळतील, असे सांगून प्रत्येक टास्कसाठी रक्कम भरावी लागेल, असे सांगितले. यासाठी फिर्यादी याच्याकडे नाव, वय, बॅंकखाते नंबर, आयएफसी काेड अशी माहिती मागितली.

 त्यानंतर टास्क पूर्ण केल्यावर भरलेल्या रकमेसह रिवार्ड मिळेल असे सांगूनसुरूवातीला रिवार्ड व भरलेली रक्कम परत केली. मात्र, त्यानंतर टास्कसाठी भरलेली रक्कम ३०,७२० रुपये परत न करता फसवणूककेली.

 आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकात फिर्याद दिली. त्यानुसार १० ऑगस्टराेजी भारतीय दंड विधान कायदा कलम ४२०,३४ माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००चे कलम ६६ (क)(ड) अन्वये गुन्हा दाखल केलाआहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *