Breaking News
दापोली : महिन्यातून एक दिवस गावातच मुक्काम, गृहराज्यमंत्री योगेश कदमांचा अभिनव उपक्रम चिपळूणमध्ये मोफत डोळे तपासणीसह आरोग्य शिबिर दापोली : दापोलीला प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार मुख्याधिकारी धुमाळ यांचा निर्धार, प्लास्टिकविरोधात प्रशासन सतर्क मंडणगड : ‘जर तुम्ही कामे केली तर तुम्हाला ठार मारून टाकू’ थकीत पाणीपट्टी भरण्यास सांगितल्याने 75 वर्षीय महिला सरपंचांना शिवीगाळ, दमदाटी, विकासकामांच्या ठेकेदारांना ठार मारण्याची धमकी, कैसर अब्दुल्ला हर्ले आणि वाहिद राजेखान विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल संगमेश्वर : मोबाईल शाळेत नेल्याच्या कारणावरून पालकांनी रागावले; संगमेश्वरातील 13 वर्षीय विद्यार्थिनीचा विषारी पदार्थ सेवनाने मृत्यू

चिपळूण : व्हिसेरा अहवाल प्राप्त, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अंतिम अहवालाची प्रतीक्षा

banner 468x60

चिपळूण येथील नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यूनंतर अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र, तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट हाेण्यासाठी पोलिसांना व्हिसेरा अहवालाची प्रतीक्षा हाेती. हा अहवाल शुक्रवारी (११ ऑगस्ट) पोलिसांना प्राप्त झाला.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

या अहवालानुसार तिच्या शरीरात कोणतेही विषारी द्रव्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दापोली येथील एका बॅंकेत कामाला असणारी नीलिमा ओमळी येथील गावी जाण्यासाठी २९ जुलै रोजी निघाली होती.

मात्र, तिचा १ ऑगस्ट रोजी दाभोळ खाडीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर तिच्या मृत्यूबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन प्राथमिक तपासानुसार तिचा घातपात नसल्याचे स्पष्ट केले होते.

तपासात त्यांनी १०४ साक्षीदारही तपासल्याचे सांगितले होते. त्याचवेळी व्हिसेरा अहवालानुसार सर्व चित्र स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले होते. त्यामुळे पोलिसांना व्हिसेरा अहवालाची प्रतीक्षा होती.

हा अहवाल तातडीने मिळावा, अशी विनंतीही पोलिसांनी केली होती. हा अहवाल शुक्रवारी पोलिसांना प्राप्त झाला असून, तिच्या शरीरात कोठेही विषारी द्रव्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

तसेच शवविच्छेदनाच्या अहवालानुसार तिच्या शरीरावर कोठेही जखमा नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे आता वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *