रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा जेटी क्रमांक २ येथे किरकोळ कारणावरून पानटपरी चालक आणि त्याच्या भावाला मारहाण केल्याची घटना ३१ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री घडली. या घटनेत दोघे भाऊ जखमी झाले असून, पानटपरीतील साहित्याचीही तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसी अब्दुल रेहमान डोना (वय १९, रा. मालवणकर कंपाऊंड, चर्च रोड, बाजारपेठ, रत्नागिरी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १२.१० वाजता समद खत्री (पूर्ण नाव माहीत नाही, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) याने पानटपरीवर जाऊन वसी आणि त्यांचा भाऊ नफिज अब्दुल रेहमान डोना (वय २२) यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.
संशयिताने दोघांच्या पाठीवर व मानेवर हाताने मारहाण केली. त्यानंतर खिशातील चावी नफिज यांच्या उजव्या कानावर मारल्याने त्यांच्या कानाला दुखापत होऊन रक्तस्राव झाला. तसेच पाण्याच्या बाटल्यांची केस डोक्यावर मारल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकारादरम्यान संशयिताने पानटपरीतील साहित्याची तोडफोड करून नुकसान केले. दोन्ही भावांना शिवीगाळ करून घरात घुसून मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणी ३१ ऑक्टोबर रोजी पहाटे ४.०५ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४५३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३५१(२), ३२४(२), ११८(१), ११५(२) आणि ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील संशयिताला अद्याप अटक झालेली नसल्याची माहिती आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













