दापोली : राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम गुरुवार, २९ ऑक्टोबर रोजी दापोली दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. दापोली पंचायत समिती कार्यालयात जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच, कर्दे येथे त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन होणार असून, दापोली शहरातील एका दुकानाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
राज्यमंत्री योगेश कदम हे गुरुवारी सकाळी ७ वाजता मुंबईतील कांदिवली येथील ‘पालखी’ निवासस्थानावरून मोटारीने दापोलीकडे रवाना होतील. सकाळी ११.३० वाजता दापोलीतील पोस्ट गल्ली येथे ‘पृथ्वीराज इलेक्ट्रॉनिक्स’ या दुकानाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.
दुपारी १२.०१ वाजता दापोली पंचायत समिती कार्यालयात जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीत तालुक्यातील योजनांची सद्यस्थिती आणि सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला जाण्याची अपेक्षा आहे.
यानंतर सायंकाळी ४ वाजता दापोली तालुक्यातील कर्दे येथे राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन होणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता दापोलीतील कोकंबाआळी येथील संपर्क कार्यालयात भेटीगाठींसाठी वेळ राखीव ठेवण्यात आला आहे.
दिवसभरातील नियोजित कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर रात्री ८.३० वाजता योगेश कदम दापोलीहून पुण्याकडे रवाना होणार आहेत.
राज्यमंत्री योगेश कदम यांच्या या दौऱ्यात जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा आणि स्थानिक विकासकामांचे भूमिपूजन हे महत्त्वाचे कार्यक्रम असणार आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













