रत्नागिरी शहरातील नाचणकर चाळ परिसरात पोलिसांनी कारवाई करत १ किलो २०१ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने तो स्वतःच्या ताब्यात बाळगल्याच्या संशयावरून सूरज परशुराम नंदिवले (वय २४) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत एकूण ६० हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई बुधवार, दि. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रभारी पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक शहर परिसरात गस्त घालत असताना नाचणकर चाळ येथे ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज नंदिवले हा नाचणकर चाळ, एमआयडीसी, रत्नागिरी येथे वास्तव्यास असून तो मूळचा पाचवड, ता. वाई, जि. सातारा येथील आहे. त्याच्याकडे विक्रीच्या उद्देशाने गांजा बाळगल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS Act) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.
कारवाईत सहभागी पोलीस पथक
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस फौजदार दीपक साळवी, पोलीस हवालदार शांताराम झोरे, दिनेश आखाडे, अमोल भोसले, भालचंद्र मयेकर तसेच पोलीस कॉन्स्टेबल अमित पालवे आणि निलेश शिंगवे सहभागी होते.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













