रोजगाराच्या निमित्ताने ओमान देशातील सलाला येथे गेलेल्या रत्नागिरी तालुक्यातील केळ्ये-माजगाव येथील २३ वर्षीय तरुणाचा विजेचा तीव्र धक्का लागून मृत्यू झाला. अफिफ इरफान खल्पे असे या तरुणाचे नाव असून, तो रत्नागिरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष ताजुद्दीन खल्पे यांचा पुतण्या होता. या घटनेमुळे केळ्ये-माजगावसह रत्नागिरी परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अफिफ हा सुमारे दोन वर्षांपूर्वी रोजगारासाठी ओमानमधील सलाला येथे गेला होता. काम पूर्ण करून तो अवघ्या महिन्याभरात आपल्या गावी परतणार होता. मात्र, मायदेशी परतण्याची तयारी सुरू असतानाच त्याच्यावर काळाने घाला घातला. कामावर असताना विजेचा तीव्र धक्का बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
अफिफच्या निधनाची बातमी समजताच त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तरुण वयातच त्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अफिफचा मृतदेह मायदेशी आणण्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे. गावी परतण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना घडलेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हळहळला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













