मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर निवळी घाटात गॅस वाहू टँकर उलटून महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प पडली आहे. शनिवारी दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी अपघात झाला.
🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर संपर्क करा 9960151909
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर निवळी घाट उतरत असलेला गॅस वाहू टँकर महामार्गावर मधोमध आडवा झाल्याने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद पडली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी घाटात दुपारी सव्वा दोनच्या सुमारास टँकर उलटून अपघात झाला.
आजच्या एका दिवसात गॅस टँकरच्या दोन घटना घडल्या आहे. यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. अपघातग्रस्त टँकर मुंबईच्या दिशेने जात होता. निवळी घाटात आला असता चालकाचा ताबा सुटून भर रस्त्यात केबिन आणि गॅस टँकर वेगवेगळे झाल्याचे पाहायला मिळत आहे.
सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून यामधील टँकरचालक बचावला आहे.
अपघाताची माहिती मिळताच हातखंबा टॅबचे पोलीस कर्मचारी दाखल झाले असून रत्नागिरी येथून अग्निशामक दलाचा बंब देखील दाखल झाला आहे. अधिक तपशील मिळाल्यावर बातमीत अपडेट केला जाईल.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*