मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अंजनारी पुल परिसरात हयगयीने आणि बेदरकारपणे वाहने चालवल्याप्रकरणी दोन वाहनचालकांविरुद्ध लांजा पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २१ आणि २२ ऑक्टोबर २०२६ रोजी घडलेल्या या घटनांप्रकरणी भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम २८१ नुसार कारवाई करण्यात आली आहे.
२१ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास अंजनारी पुल परिसरात गुजरात पासिंगचा आयशर टेम्पो (क्र. जीजे १२ बीवाय ९५५८) सार्वजनिक रस्त्यावर हयगयीने व बेदरकारपणे चालविल्याचा आरोप चालक किशोर विजय महेश्वरी (वय ४५, रा. कोडाई मांडवी, कच्छ, गुजरात) याच्यावर आहे. या प्रकरणी महिला पोलीस कर्मचारी निधी नितेश आर्डे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.४६ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसरी घटना २२ ऑक्टोबर रोजी पहाटे ५.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. अंजनारी पुल परिसरात मुंबई-गोवा महामार्गावर टाटा ट्रक (क्र. एमएच ३३ बीपी १९६०) हयगयीने व बेदरकारपणे चालविल्याचा आरोप चालक प्रेमशंकर शत्रुधन यादव (वय ३४, रा. बेसुंबपुर, ता. हसनगंज, जि. उन्नाव, उत्तर प्रदेश) याच्यावर आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई शिवाजी आनंदा कळंत्रे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार २२ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.५९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
महामार्गावर वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणे आणि वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अंजनारी पुल परिसरात सलग दोन दिवसांत दोन वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल झाल्याने महामार्गावरील सुरक्षित वाहनचालना आणि नियमपालनाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













