संगमेश्वर तालुक्यातील काटवली येथे नदीपात्रातील बंधाऱ्यावर मासेमारीसाठी गेलेल्या ५४ वर्षीय व्यक्तीचा खोल डोहात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. प्रकाश अर्जुन गेल्ये (वय ५४, रा. काटवली, ता. संगमेश्वर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे काटवली गावात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश गेल्ये हे नदीपात्रातील बंधाऱ्याजवळ मासेमारी करण्यासाठी गेले होते. यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते खोल डोहात बुडाले. पाण्यातून बाहेर पडण्याची संधी न मिळाल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. शोधमोहीम राबवून त्यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. या घटनेची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस पुढील कायदेशीर कार्यवाही करत आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे काटवली परिसरात शोककळा पसरली आहे. नदीपात्र, बंधारे आणि खोल डोहांच्या परिसरात जाताना नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













