Breaking News
खेड : मंत्री योगेश कदम यांचा पीए असल्याचे भासवून 5 हजारांची फसवणूक, खेडमध्ये गुन्हा दाखल, मंत्र्यांची भेट घडवून देण्याचे आणि काम करून देण्याचे दिले होते आश्वासन, रविराज चिखले याच्याविरोधात कारवाईची नोंद दापोली : तीन प्रकल्पांविरोधात संघर्ष पेटणार! प्रकल्प रद्द करण्यासाठी युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघ आक्रमक खेड : सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या दोघांवर पोलिसांची कारवाई दापोली : बंदूक चोरीला, तीन महिन्यांनी गुन्हा दाखल! बेडरूममधून 12 बोअरची बंदूक लंपास BIG NEWS सिंधुदुर्ग : इंस्टाची ओळख, एकाच कॉलेजमध्ये एकतर्फी प्रेमदामिनीची हत्या, हत्येचा घटनाक्रम A to Z स्टोरीआरोपीला अटक; हत्येचा घटनाक्रम उघड

खेड : मंत्री योगेश कदम यांचा पीए असल्याचे भासवून 5 हजारांची फसवणूक, खेडमध्ये गुन्हा दाखल, मंत्र्यांची भेट घडवून देण्याचे आणि काम करून देण्याचे दिले होते आश्वासन, रविराज चिखले याच्याविरोधात कारवाईची नोंद

banner 468x60

राज्याचे मंत्री योगेश कदम यांचा स्वीय सहाय्यक (पीए) असल्याचे भासवून एका सामाजिक कार्यकर्त्याची ५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार खेड येथे समोर आला आहे. या प्रकरणी रविराज चिखले याच्याविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(२), ३१८(४) आणि ३१९(२) अन्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्याधर दत्ताराम साळुंखे (वय ५६) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. साळुंखे हे मूळचे चिपळूण तालुक्यातील बोरगाव-साळुंखेवाडी येथील रहिवासी असून, सध्या मुंबई येथे वास्तव्यास आहेत. ते तालुका आणि ग्रामपातळीवर सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतात.

चिपळूण तालुक्यात अनधिकृत चिरा-दगड खाणी सुरू असल्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असल्याची बाब मंत्री योगेश कदम यांच्या निदर्शनास आणून द्यायची होती. यासाठी मंत्र्यांची भेट घेण्याचा साळुंखे यांचा प्रयत्न होता.

याचदरम्यान, रविराज चिखले याने आपण मंत्री योगेश कदम यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे भासवले. तसेच मंत्र्यांची भेट घडवून देण्याचे आणि साळुंखे यांचे काम करून देण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या आश्वासनापोटी १७ सप्टेंबर २०२६ रोजी खेड येथे चिखले याने साळुंखे यांच्याकडून ५ हजार रुपये रोख घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे.

मात्र, पैसे घेतल्यानंतर मंत्र्यांची भेट घडवून देण्यात आली नाही तसेच सांगितलेले कामही करून देण्यात आले नाही, असा आरोप साळुंखे यांनी केला आहे. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

या प्रकरणी १८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ७.२९ वाजता खेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४२/२०२६ नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.

मंत्र्यांचा निकटवर्तीय असल्याचे भासवून पैसे घेतल्याच्या या प्रकारामुळे खेड परिसरात चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *