लांजा : लग्नाची बोलणी करण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार

banner 468x60

लांजा तालुक्यातील कुरणे पडयेवाडी येथील घटना ही घटना समोर आली आहे. लग्नाची बोलणी करण्यासाठी गेलेल्या तरुणावर किरकोळ वादातून कोयतीने वार करून त्याला जखमी केल्याची घटना तालुक्यातील कुर्णे पडयेवाडी येथे घडली आहे.

banner 728x90

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

या प्रकरणी ४६ वर्षीय व्यक्तीवर लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी ७ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश रामचंद्र पडये (वय ४६, राहणार कुर्णे पडयेवाडी) याची घटस्फोटीत मुलगी आहे.

या मुली बरोबर लग्न करण्यासाठी फिर्यादी राजेश एकनाथ चव्हाण ( वय ४०, राहणार गवाणे तालुका लांजा) इच्छुक होता. यासाठी राजेश चव्हाण आणि सुरेश पडये या दोघांमध्ये बोलणी सुरू होती. तसेच या संदर्भात ४ ऑगस्ट रोजी लग्ना संदर्भात बोलणेदेखील झाले होते.

आणि लग्न करण्याचे देखील ठरवण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी ७ ऑगस्ट रोजी राजेश चव्हाण हा सुरेश पडये यांच्या कुर्णे येथे घरी पुन्हा एकदा लग्न संदर्भात बोलणे करण्यासाठी दुपारी गेला होता. हे बोलणे सुरू असतानाच दोघांमध्ये किरकोळ स्वरूपात वाद झाले.

मात्र या वादातून सुरेश पडये याने आपल्या घरातील कोयती आणून राजेश चव्हाण याच्या डोक्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये राजेश याला पाच टाके पडलेत.

या घटनेत जखमी झालेल्या राजेश चव्हाण याने ७ ऑगस्ट रोजी रात्री १०.४४ वाजता लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. राजेश चव्हाण याने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी सुरेश पडये याच्यावर भा.द.वि. कलम 324, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे .याबाबत अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल एन. एस. नावलेकर करत आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *