राजापूर शहरातील शिवाजी पथ रोड ते बाजारपेठ जाणाऱ्या मार्गावर महालक्ष्मी हॉटेलसमोर रस्त्यावर मच्छी विक्री करताना तसेच मच्छीची खवले आणि सांडपाणी रस्त्यावर टाकून परिसरात दुर्गंधी पसरवल्याप्रकरणी सहा महिलांविरोधात राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.२० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी राजापूर नगरपरिषदेचे स्वच्छता मुकादम राजन रामचंद्र जाधव यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक अमित मोहन पोवार, सफाई कर्मचारी संदेश नाना जाधव यांच्यासह पथक मच्छी विक्री करणाऱ्या महिलांवर कारवाई करण्यासाठी संबंधित ठिकाणी गेले होते. त्यावेळी काही महिला रस्त्यावर मच्छी विक्री करताना आढळून आल्या. तसेच मच्छीची खवले आणि मच्छीचे पाणी रस्त्यावर टाकल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी सादिका फणसोपकर, शाहिन फणसोपकर, अक्सा समीर सोलकर, नाजिया वाडकर, अनिसा रशीद सोलकर आणि सुमय्या बोरकर, सर्व रा. नाटे परिसर, ता. राजापूर, यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी महाराष्ट्र नगरपालिका, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम २६७ व २६९ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ११५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजापूर शहरातील सार्वजनिक रस्ते आणि परिसरात अस्वच्छता निर्माण करणाऱ्या प्रकारांविरोधात नगरपरिषदेकडून कारवाई सुरू असून, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













