राजापुरात तीन पत्ती जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, सहा जणांवर गुन्हा

banner 468x60


राजापूर शहरातील खडपेवाडी येथे विनापरवाना सुरू असलेल्या तीन पत्ती मटका जुगार अड्ड्यावर राजापूर पोलिसांनी शनिवारी रात्री छापा टाकला. या कारवाईत सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी ५ हजार ७९५ रुपयांची रोकड, ५२ पानी पत्त्यांचे तीन कॅट, दोन पेन आणि आकडेमोड लिहिलेली एक वही जप्त केली.

शनिवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. खडपेवाडी येथील विलास केरू पवार यांच्या घरात विनापरवाना जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता, तीन पत्ती मटका जुगार खेळताना सहा जण आढळून आले.

याप्रकरणी राजापूर पोलिस ठाण्याचे शिपाई संग्राम कृष्णात नरुटे यांनी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून समीर रविकांत शिंदे (४२), विरेंद्र विठ्ठलराव देसाई (४३), गजाननप्रसाद विठ्ठल कोळवणकर (३९), दीपक महादेव पवार (३८), मंगेश शंकर ढवळे (५०) आणि विलास केरू पवार (७६) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी संशयितांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून एकूण ५,७९५ रुपयांची रोकड मिळून आली. तसेच जुगारासाठी वापरण्यात येणारे पत्ते, पेन आणि आकडेमोडीची वही असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *