दापोली येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी स्वरा चव्हाण हिने उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. १७ वर्षांखालील मुलींच्या गटात स्वराने गोळाफेक या क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदक पटकावले.
या दमदार कामगिरीच्या जोरावर स्वराची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तालुकास्तरावर मिळवलेल्या या यशामुळे स्वराच्या पुढील क्रीडा प्रवासाला महत्त्वाची संधी मिळाली असून, जिल्हास्तरीय स्पर्धेतही ती उत्तम कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
गोळाफेकीसोबतच स्वराने थाळीफेक या क्रीडा प्रकारातही आपली गुणवत्ता सिद्ध केली. या स्पर्धेत तिने कांस्य पदक मिळवत दुहेरी यश संपादन केले.
स्वराच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन सुजय मेहता, मुख्याध्यापिका रितू मेहता आणि क्रीडा मार्गदर्शक सुहास नलावडे यांनी तिचे विशेष अभिनंदन केले. योग्य प्रशिक्षण, सातत्यपूर्ण सराव आणि मार्गदर्शकांचे मोलाचे मार्गदर्शन यामुळे हे यश मिळवणे शक्य झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
स्वराच्या या यशामुळे सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलसह करंजाणी परिसराचेही नाव क्रीडा क्षेत्रात उजळले आहे. तिच्या दुहेरी यशाबद्दल शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच परिसरातील नागरिकांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आता जिल्हास्तरीय स्पर्धेत स्वरा चव्हाण कशी कामगिरी करते, याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













