कामानिमित्त दापोली तालुक्यात आलेल्या पालघर जिल्ह्यातील एका मजुराचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अशोक केवजी फडवळे (वय ३९, रा. पिंपळकडा, सारसून, पो. जामसर, ता. जव्हार, जि. पालघर) असे बेपत्ता झालेल्या मजुराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक फडवळे हे दापोली तालुक्यातील ताडील बागवाडी येथे नियाज अब्दुल्ला अराई यांच्याकडे झाडे तोडण्याच्या कामासाठी आले होते. २९ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे साडेअकराच्या सुमारास कावीळ झाल्याने प्रकृती ठीक नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर मूळ गावी पालघर येथे जाण्यासाठी ते ताडील बागवाडी येथून निघाले.
मात्र, त्यानंतर अनेक दिवस उलटूनही अशोक फडवळे घरी पोहोचले नाहीत. पती घरी न परतल्याने पत्नी जयवंती फडवळे यांनी नातेवाईक, शेजारी तसेच आजूबाजूच्या परिसरात त्यांचा शोध घेतला. मात्र, सर्वत्र शोध घेऊनही त्यांचा ठावठिकाणा लागला नाही.
आजारी असल्याचे सांगून गावी निघाल्यानंतर अचानक संपर्क तुटल्याने अज्ञात व्यक्तीने कोणत्यातरी कारणातून त्यांना पळवून नेले असावे, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
जयवंती फडवळे यांच्या तक्रारीवरून दापोली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, बेपत्ता अशोक फडवळे यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













