दापोली तालुक्यात बेकायदा दारू विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवलेला ४ हजार ६४० रुपये किमतीचा देशी दारू आणि बिअरचा साठा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जप्त केला. ही कारवाई २ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे १२.२८ वाजता करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, दापोली येथील राजेंद्र मयेकर यांच्या किराणा दुकानाच्या पाठीमागे एका भिंतीच्या आडोशाला संशयितरित्या दारूचा साठा ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली असता राजेंद्र चंद्रकांत मयेकर (वय ४७, रा. टांगर, गावठाणवाडी, ता. दापोली) हा बेकायदेशीररित्या दारू विक्रीच्या उद्देशाने मद्यसाठा बाळगताना आढळून आला.
पोलिसांनी त्याच्याकडून एकूण ४४ प्लास्टिकच्या सिलबंद बाटल्या देशी दारू ‘संत्रा जीएम’ (९० मिली) जप्त केल्या. प्रत्येक बाटलीची किंमत ४० रुपये असून या दारूची एकूण किंमत १ हजार ७६० रुपये आहे.
तसेच ‘लंडन पिसनर’ कंपनीच्या ६५० मिली क्षमतेच्या १६ काचेच्या सिलबंद बिअरच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. प्रत्येक बाटलीची किंमत १८० रुपये असून या बिअरची एकूण किंमत २ हजार ८८० रुपये आहे.
अशाप्रकारे पोलिसांनी एकूण ४ हजार ६४० रुपये किमतीचा मद्यसाठा ताब्यात घेतला.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोहेकॉ./१४०८ योगेश दशरथ शेटये (वय ४०) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २११/२०२६, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई २ ऑक्टोबर रोजी करण्यात आली असून त्याच दिवशी सायंकाळी ४.३५ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली. बेकायदा दारू विक्रीविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













